Saturday, June 11, 2011

अनुभूती ......... !


प्रिय मित्रांनो ! संतांच्‍या कथा व चरित्रातून मिळणारा आनंद अवर्णनिय आहे. म्‍हणून चांगल ऐकाव चांगल लिहाव संतांचे गोडवे गावेत. संत आई सारखे नव्‍हे आईच आईची सुध्‍दा आई म्‍हणजे संत .... माझा विदयार्थी हेमंत देशमुख गजानन भक्‍त ! अगदी चांगली सांगड लागली . गजाननाची इच्‍छा !
रामनवमीच्‍या अगोदरच्‍या दिवशी बुलडाण्‍याला जातांना वाटेत, छानश्‍या झाडांच्‍या दाटीत चहाचा सुगंध सुटला होता. अनिवार इच्‍छा चहा पिण्‍याची ! पण नेमके माहिती नव्‍हते काय आहे आणी कशाचा कार्यक्रम आहे. बुलडाण्‍याचे काम आटोपले. परतीच्‍या प्रवासात पुन्‍हा तिथेच आलो . आता मात्र तिथे खामगावच्‍या दिशेने गजानन महाराजांचा फोटो लावलेले बॅनर होते, मग उत्‍सुकतेपोटी तिथे गेलो. या या ! प्रेमाने स्‍वागत झाले! तेथे गोळा झालेल्‍या भक्‍तांनी सांगीतले, पायदळ वारी करणा-या भाविकांचा थोडा श्रमपरिहार व्‍हावा, नविन स्‍फुर्ती मिळावी, म्‍हणून या जंगलात चहाची सोय केली आहे. वनविभागाने हातपंपाची व्‍यवस्‍था केली आहे. आम्‍ही वरवंड चे गजानन भक्‍त आहोत गावात गजाननाचे मंदीर बांधले आहे, कधीतरी दर्शनाला या ! या आग्रहाच्‍या निमंत्रणाचा आणि चहाचा गोडवा चिभेवर खेळवत आम्‍ही गजाननाला नमस्‍कार करून निघालो.
रस्‍त्‍याने जातांना म्‍हणालो, हेमंत उदया पायी शेगावला जावू या का ? आपण म्‍हणाल तसे सर ! मी : ठिक आहे, जायचेच ! बर काय नेवू रे गजानना साठी ? हेमंत : बेसन भाकरी आवडत होती सर महाराजांना .... तेच नेवू ....! मी : अरे नेहमी बेसन भाकरी .... त्‍यापेक्षा उदया रामनवमी आहे, पुरणपोळी नेवू महाराजांसाठी....... तु उदया सकाळी 3 वाजता घरी ये , मी आईला सांगून पुरणपोळी बनवून ठेवायला सांगतो. असे सांगून मी हेमंतचा निरोप घेतला.
घरी आलो रात्री आईशी बोलणे झाले नाही. मी पण झोपून गेलो. सकाळी 2.30 ला जाग आली, आता आईला उठवावे किंवा नाही असा प्रश्‍न पडला ! शेवटी ती पण गजानन भक्‍तच ! आवाज दिला .... मनातील गोष्‍ट सांगीतली. आई आनंदाने तयार झाली .... 15 मिनिटात कुकरच्‍या शिटया झाल्‍या 30 मिनिटात जायफळ आणि तुपाचा सुवास सा-या घरात दरवळत होता......
मग आम्‍ही सगळे 3.30 चे सुमारास निघालो, अमरसिंग लंगडा, गोविंद हूरपडे वकीलसाहेब, हेमंत देशमुख सोबत होतेच .... रस्‍त्‍याने गारडगावची चिमुरडी 12 - 13 वर्षाची मुले छान रमत गमत निघाली होती. मुखाने अभंग गात ... गजानन महाराजांचा जयजयकार करीत.... शिस्‍तीत आम्‍ही जात होतो. मी देखील बासरी काढून भुपाळीने महाराजांना आळविले. 7 वाजेच्‍या सुमारास आम्‍ही शेगावात पोचलो. दर्शनबारीमध्‍ये भारी गर्दी पण अतिशय शिस्‍तबध्‍द व शांत वातावरण ....! दर्शनबारीमध्‍ये एक मध्‍यम वयाचे जोडपे अतिशय तालबध्‍द स्‍वरात महाराजांची भजने गात होते. त्‍यांच्‍या आवाजातून महाराजांच्‍या भेटीची ओढ हृदयाला पिळवटून टाकत होती. अतिशय भारलेल्‍या, मंतरलेल्‍या अनामिक ओढीने 2 तासानंतर गाभा-यात प्रवेशित झालो. प्रचंड गर्दीचा ताण सेवकांवर आलेला दिसत होता. सारख्‍या त्‍याच त्‍याच सुचना देत भक्‍तगणांना ‘’ माउली ‘’ अशी प्रेमाने साद घालतांना त्‍यांना जराही थकवा येत नव्‍हता.
आता महाराजांची मुर्ती प्रत्‍यक्ष समोर होती. जगाच्‍या बादशहा समोर हातातला पुरणपोळीचा डबा फारच क्षुल्‍लक वाटत होता. सुदाम्‍याला पोहे घेवून जातांना काय वाटले असेल....... ! अशातच माझ्या समोर असलेल्‍या भक्‍ताने त्‍याच्‍या जवळचा प्रसाद महाराजांच्‍या समोर ठेवण्‍याचा प्रयत्‍न केला असता कधिही न चिडणारा सेवक प्रचंड चिडला व प्रसाद वर राम मंदिरात ठेवा इथे नाही , असे ओरडून त्‍याने तो प्रसाद पुन्‍हा भक्‍ताच्‍या अंगावर फेकून दिला. मी खटटू झालो. हेमंतकडे पाहीले.... त्‍याचीही अवस्‍था काही वेगळी नव्‍हती. काय होणार आहे, याची आम्‍हाला कल्‍पना आली. अर्धवट उघडलेला डबा मी बंद करू लागलो होतो........ एक एक क्षण युगांसारखा वाटत होता....... पण माझ्र्या मनातली घालमेल अनंतकोटी ब्रम्‍हांडनायक, महाराजाधिराज योगीराज परब्रम्‍ह , सत्चितानंद , भक्‍त प्रतिपालक , शेगावनिवासी समर्थ सदगुरू श्री. गजाननाच्‍या लक्षात आली होती......... भारावलेल्‍या मनाने बाहेर जाण्‍याच्‍या रस्‍त्‍याने वळलो......आणि अचानक .......अहो तो डबा इकडे दया ! माझा माझ्या कानावर विश्‍वास बसत नव्‍हता ...... हेमंतही थबकला .....सेवक म्‍हणत होता ... डबा दया ... वेळ थांबली होती. सेवकाने आमच्‍या हातातला डबा घेतला...... म्‍हणाला महाराजांना नैवेदय दाखवतो....... डोळयांमध्‍ये आसवांनी गर्दी केली होती..... आवाज बाहेर‍ निघत नव्‍हता...... वारी सफल झाली होती...... गजाननाच्‍या प्रितीचा अनुभव आला होता..... माझा विश्‍वास अनाठाई नाही .... मी आहेच आहे !!! या वचनाची महाराजांनी अनुभूती दिली होती.......... आवाज ऐकु येत होता ..... ‘’

मी गेलो ऐसे मानु नका .......!

Thursday, June 18, 2009

वाढदिवसाचे झाड !




fdfdfdfdfd १८ मे २००७ आमच्या प्राचीचा ३ रा वाढदिवस ! तिचा वाढदिवस संस्मरणीय ठरावा , ही आमची ईछा ; अशी भेट काय असेल की तिला कधीच विसरता येणार नाही , यावर माझी आणि सौ ची चर्चा सुरू होती . वाढदिवस संस्मरणीय ठरावा , ही आमची इच्छा ; पण त्यातून काही मार्ग निघत नव्हता. मी प्राचीला सकाळी नेहमी फिरायला नेत होतो. तिला सकाळी रस्त्यावर असलेले लोक , मुले, मुली पाहून आनंद होत असे. एक दिवस रस्त्याच्या कडेला फुललेले गुलमोहराचं झाड पाहून ती चिमुकली म्हणाली,
प्राची : बाबा हे झाड किती सुंदर आहे !


मी : बेटा ते तुझ्या सारखचं सुंदर आहे.


पण त्यानंतर मात्र बाई साहेबानी हट्ट धरला, मला त्या झाडाची फुले पाहिजेत !


आम्ही दोघे झाडाखाली गेलो, वाळलेली फुले जमिनीवर पडली होती ; मात्र जुंडाला ( प्राची चे लाडा चे नाव ) ताजी फुले हवी होती. म्हणून मग वाळलेली काटकी घेऊन काही फुले काढली . पुनः फिरत घरी आलो . दुसर्‍या दिवशी बाई साहेबानी नवीन फर्माईश केली.


प्राची: हे झाड घरी घेऊन चला ! आता काय करणार ?


मी : हे झाड दुसर्‍याचे आहे. ते नेता येऊ शकत नाही , खूप मोठे आहे.


प्राची : मला पाहिजे.......................


आपण ट्रक्टर मधे नेऊ .


मी : ठीक आहे उद्या पाहु !


प्राची : नक्की.....................


मी : नक्की !


या उत्तराने काहीसे समाधान झाल्याचे दिसत होते.


sssssssssदुसर्‍या दिवशी प्राची गोंधळ घालेल या भीतीने मी तिला फिरायला नेलेच नाही. ती झोपलेली असतांनाच मी निघून गेलो. १ तासानंतर परत आलो . वातावरण थोडं तापल्यासारखं वाटत होतं. नुकतीच आणीबाणी जाहीर झाली असावी . बाईसाहेब सोफ्यावर बसून होत्या . डोळ्यांच्या खाली आसवांचा महापूर नुकताच येऊन गेल्याच्या खुणा होत्या. गालावर मूठ , न हालणारी नजर , गालांचा फुगा , हे सगळ पाहून मी सौ. ना खुणेने विचारल.


मी : ?


सौ. : हळुच माझ्या कानात ) गुलमोहोराच झाड ! माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. तोफेचा भडिमार सुरू होण्याची व त्यात माझा बळी जाण्याची दाट शक्यता होती. मी हळुच बाथ रूमकडे जाउ लागलो. तेवढ्यात ...........................


प्राची : बाबा इकडे या.


मी: बेटा , आंघोळ करून येतो हं !


प्राची : आत्ताच्या आत्ता या.... ( सोबतीला सनईचा आवाज सुरू झाला, आता नदयांना महापूर येणार , हे ओघानेच आले. त्यामुळे मी अधिक रिस्क न घेता निमूटपणे पुकार्‍यावर हजर )


प्राची : झाड आणल .......... ( मी गप्प ) तुम्ही खोट बोलता ..... आज तुम्ही झाड आणून देणार होते .प्रत्येक शब्दा नंतर सनई , जोराचे उसासे .. मी निमुटपणे ऐकत होतो .. बोलायला जागा होतीच कुठे ?


aaaaaaएवढ्यात कुरकुरे आजोबा आले. ( प्रल्हादजी उन्हाळे नेहमी कुरकुरे आणतात म्हणून ते कुरकुरे आजोबा ! ) गालगुच्चे काका, चिमटे आजोबा, असे तिचे अनेक नातेवाईक ! त्यांनी विचारले , काय झाले ? रडत रडत सगळी कहानी सांगून झाली. कुरकुरे आजोबांनी मात्र सहज समस्येचे समाधान करुन टाकले. मी तुला आजच आणि आताच गुलमोहराच झाड आणुन देतो. मग तर झाल !फक्त तु खुद्कन हसुन दाखव ! पहा बर, खरच ? नाही तर मी तुमच्याशी बोलणार नाही.कुरकुरे आजोबांच्या डोक्यातली कल्पना माझ्या डोक्यातच नव्ह्ती. आजोबांनी गाडी काढली. बाईसाहेब पेट्रोल टॅंक वर विराजमान झाल्या . एवढयात कुरकुरे आजोबांनी मलासुद्धा आवाज दिला. पुन्हा एकदा बाईसाहेब कडाडल्या " त्यांना सोबत घेऊ नका. झाली का पंचाईत ! मात्र कुरकुरे आजोबांजवळ प्रत्येक समस्येचे समाधान होते . ते म्हणाले ""मग झाड कोण पकडेल ? . यावर मात्र प्राची निरूत्तर झाली. तिने शरणागती पत्करून असहायतेने माझ्याकडे पाहले. मी विजयी विराप्रमाणे तिच्याकडे दुर्लक्ष केले . त्यावेळी ती माझी मन धरणी करेल असे वाटत होते . मात्र रंग काही वेगळाच दिसत होता. नाइलाजाने पडत्या फळाची आज्ञा म्हणून गाडीवर बसलो . गाडी निघाली सरळ जिल्हा परिषदेच्या कन्या शाळेसमोरील रोप वाटिकेतगाडी थांबली . दुकानदाराला फर्मान सुटले गुलमोहराचे झाड दाखव. साधारण ४ ते ५ फूट झाड आजोबांना आवडले . घसघिस करून ते २०० रुपयांना पदरात पडले .


प्राची: '' याला तर तशी फुले नाहीत. हे खूप छोटे आहे काही चांगले नाही . मला हे झाड नको ! ते रस्त्यावरचेच पाहिजे !''आता पुन्हा पंचाईत ! बाप रे बाप ! मग मात्रा माझा तोल जाणारच होता! पण आजोबांच्या पोटडीत अनेक कल्पना होत्या . त्यांनी सांगितले की मोठे झाड नेता येणार नाही आणि हे झाड जमिनीत लावले की मोठे होते व त्याला छान फुले येतात !
प्राची ! "ओ के ! "
झाड घेऊन आम्ही निघालो रस्त्याने गुलमोहराच्या झाडाची पाने व विकत आणलेल्या झाडाची पाने तपासून झाली. झाड घरात आले! बंगल्याच्या बाजूला १००० चौरस फुट जागा मोकळी असल्याने ईशान्य कोपर्‍यात झाड लावायच निश्चित झाल !
त्याला ट्री गार्ड आणल. त्यावेळेला आम्हाला कल्पना सुचली वाढदिवसाचे प्रेझेंट या झाडालाच का म्हणू नये ? घरातल्या सगळ्याना ही कल्पना आवडली ; झाडाला निट ठेवण्यात आले. अमरसिंग काका ने खड.डा खोदुन दिला.काळे काकानी कुठली तरी पावडर टाकून वाळवी लागणार नाही याची व्यवस्था केली. बरोबर दोन दिवसांनी झाड १८/०५/२००७ ला खड्ड्यात स्थानापन्न झाल. साधारण १ आठवडा प्राची दररोज झाड किती मोठ झाल हे ना चुकता पाहत होती . फूल न दिसल्याने ती खट्टू होत होती. नेहमी म्हणत होती , झाडाला फुले का येत नाहीत. त्यावर आम्ही तिला दररोज पाणी देत जा, म्हणजे फुले येतील असे सांगत होतो. साधारण १ आठवडा प्राची दररोज झाड किती मोठ झाल हे ना चुकता पाहत होती . फूल न दिसल्याने ती खट्टू होत होती. नेहमी म्हणत होती , झाडाला फुले का येत नाहीत. त्यावर आम्ही तिला दररोज पाणी देत जा, म्हणजे फुले येतील असे सांगत होतो. ७ /८ दिवसात ती सगळ विसरली . त्यानंतर प्राचीचा ४ था, ५ वा वाढदिवस झाला. त्यावेळी आम्ही शेवगा, कडुलिंब ही झाडे लावली. या निमित्ताने एक चांगला पायंडा पडला होता .
dfdfdfdfd६ जून २००९ ला माझी मावस बहीण अंजुश्रीचे लग्न नागपूरला होते. त्याकरता आम्ही सगळे ८ - १० दिवस अगोदरच गेलो होतो. टिकडून परत आल्यावर मी फटकाच कुलुप उघडल. पोर्च मधे येत असतांना प्राची धावत गच्चीवर गेली, जोरजोरने टाळ्या पीटत ओरडू लागली . '' वाढदिवसाच्या झाडाला फूल आल ! वाढदिवसाच्या झाडाला फूल आल ! आम्ही दोघेही बाहेर आलो. बाहेर गुलमोहराच्या झाडावर एकुलत एक फूल वार्‍याच्या झुळकेने डोलत होते. त्याचा लाल केसरी रंग माझ्या प्राचीच्या चेह-यावर पसरला होता. aaaaaaaएवढ्यात कुरकुरे आजोबा आले. ( प्रल्हादजी उन्हाळे नेहमी कुरकुरे म्हणून ते कुरकुरे आजोबा !